Loksabha 2019: लोकसभेचा निकाल काहीही लागला तरी, हा विक्रम अबाधित राहणार !

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 मे 2019

लोकसभेच्या निकालाची तारीख जवळ येत असताना अनेकजण आडाखे बांधण्यात गुंतले आहेत. सरकार कुणाचेही येवो एक विक्रम अबाधित राहणार आहे हे नक्की ! या वेळी लोकसभा निवडणुका सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रम करणारं कुणीच नसेल. देशात आताच्या निवडणुकीला उभा असलेला एकही उमेदवार सर्वाधिक वेळा म्हणजे 10 पेक्षा जास्त वेळा लोकसभेत खासदार म्हणून निवडून यायचा विक्रम मोडू शकणार नाही.

नवी दिल्ली : लोकसभेच्या निकालाची तारीख जवळ येत असताना अनेकजण आडाखे बांधण्यात गुंतले आहेत. सरकार कुणाचेही येवो एक विक्रम अबाधित राहणार आहे हे नक्की ! या वेळी लोकसभा निवडणुका सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रम करणारं कुणीच नसेल. देशात आताच्या निवडणुकीला उभा असलेला एकही उमेदवार सर्वाधिक वेळा म्हणजे 10 पेक्षा जास्त वेळा लोकसभेत खासदार म्हणून निवडून यायचा विक्रम मोडू शकणार नाही.

भारतात आतापर्यंत सर्वाधिक वेळा लोकसभेची निवडणूक जिंकण्याचा विक्रम सध्या 2 नेत्यांच्या नावावर आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान हे दोघे 9 वेळा लोकसभेत निवडून गेले आहेत. पण हे दोघेही या वेळी निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. यांच्याशिवाय लोकसभेचे माजी सभापती दिवंगत पी. ए. संगमा यांनीही लोकसभेत 9 वेळा निवडून यायचा विक्रम केला आहे.

सध्याच्या लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन, करिया मुंडा, बिजू जनता दलातून भाजपमध्ये सामील झालेले अर्जुनचरण सेठी आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे शिबू सोरेन हे सगळे लोकसभेवत 8 वेळा निवडून गेलेले आहेत. पण यातल्या एकाही दिग्गजाला त्यांच्या पक्षाने या वेळी तिकिट दिलेलं नाही. त्यामुळे सर्वाधिक वेळा संसदेवर निवडून जायचा विक्रमाची यांच्याकडून बरोबरी होणंही शक्य नाही.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि मुरलीमनोहर जोशी हे दोघेही प्रत्येकी 7 वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. ते दोघेही या वेळी निवडणुकीच्या रिंगणाबाहेर आहेत. आता भाजपकडून मनेका गांधी सुलतानपूरच्या जागेवर निवडून आल्या तर त्या लोकसभेच्या सर्वात ज्येष्ठ सदस्य असतील. मनेका गांधी यांच्याबरोबरच कर्नाटकच्या कोलारमधून काँग्रेसचे खासदार के. एच. मुनिअप्पा आणि केंद्रीय मंत्री संतोषकुमार गंगवार हे नेतेसुद्धा या वेळी जिंकले आठव्यांदा लोकसभेत जातील.

Web Title: No one will break of record this PA Sangma, Ram Vilas Paswan and Kamal Nath