Loksabha 2019 : '56 इंच छाती कोणाची असते तर फक्त गाढवाची'

वृत्तसंस्था
बुधवार, 10 एप्रिल 2019

लोकसभा निवडणूकदरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पहायला मिळत आहेत. प्रचारासाठी सोशल मीडियाचाही मोठा वापर केला जात आहे.

अहमदाबाद: 56 इंच छाती कोणाची असते तर फक्त गाढवाची, असे गुजरात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोढवाडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना म्हटले आहे.  

लोकसभा निवडणूकदरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पहायला मिळत आहेत. प्रचारासाठी सोशल मीडियाचाही मोठा वापर केला जात आहे. अनेक नेते लक्ष वेधून घेण्यासाठी वादग्रस्त वक्तव्य करताना दिसतात.

अर्जुन मोढवाडिया यांना बनासकंठा जिल्ह्यातील दीसा येथे एका रॅलीत बोलताना म्हणाले, '2014 साली नरेंद्र मोदी यांनी देश चालविण्यासाठी 56 इंच छातीची गरज असते, असे म्हटले होते. पण, सामान्य व्यक्तीची छाती 36 इंच असते, बॉडी बिल्डर व्यक्तीची छाती 42 इंच असू शकते. फक्त गाढवाची छाती 56 इंच असते तर बैलाची छाती 100 इंच असते. त्याचसोबत मोदीभक्त ही गोष्ट समजू शकत नाहीत, जेव्हा कोणी त्यांच्या नेत्याला 56 इंच छातीचा नेता म्हणतात तेव्हा ते आनंदी होतात.'

'पराभवाच्या भितीने काँग्रेसच्या नेत्यांचे मानसिक संतूलन बिघडत आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांकडून अशाप्रकारे शब्दप्रयोग केले जात आहे. काँग्रेस नेत्यांच्या अशा वक्तव्याचा आणि पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या भाषेचा राज्यातील जनता मतदानातून योग्य ते उत्तर देईल,' असे भाजपचे प्रवक्ते भरत पांड्या यांनी अर्जुन मोढवाडिया यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
 

Web Title: Only donkeys can have 56-inch chest says Gujarat Congress leader Arjun Modhwadia