Loksabha 2019 : मोदींचे छायाचित्र आता टिकल्यांच्या पाकिटावर...

Pm narendra modis photo on bindi packet gets trolled
Pm narendra modis photo on bindi packet gets trolled

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र साडी, तिकिटानंतर टिकल्यांच्या पाकिटावर आले आहे. सोशल मीडियावर नेटिझन्सनी खिल्ली उडवली आहे.

लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराने वातावरण चांगलेच तापले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. प्रत्येकजण चर्चेत येण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखत आहे. सोशल मीडियावर या योजना व्हायरल होताना दिसतात. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळी शक्कल लढवली जात आहे. साडी, टी-शर्टनंतर आता बाजारात नरेंद्र मोदींचे छायाचित्र टिकल्यांच्या पाकिटही आले आहे. या पाकिटावर एकीकडे नरेंद्र मोदींचे छायाचित्र आहे, तर दुसरीकडे भाजपचे निवडणूक चिन्ह छापण्यात आले आहे. या पाकिटावर पारस फॅन्सी बिंदी लिहिण्यात आले आहे. फोटोशॉप करुन नरेंद्र मोदींचा फोटो वापरला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, अद्याप त्याची खात्री पटलेली नाही. मात्र, हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकजण भाजपची खिल्ली उडवत आहेत. नेटिझन्सनी भाजपला ट्रोल केले असून, व्हायरल करताना प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात. खिल्ली उडवत मोदींचा फोटो पाहून तुम्ही टिकली लावायचे तर सोडणार नाही ना? असा प्रश्न विचारत आहेत.

दरम्यान, नरेंद्र मोदींचे छायाचित्र असणाऱ्या साड्या बाजारात आल्या आहेत. अनेक ठिकाणी या साड्यांची विक्री होत आहे. याशिवाय मोदींचे छायाचित्र असणारे टी-शर्ट, कॉफी कप आणि टोपी बाजारात उपलब्ध आहेत. या सगळ्यानंतर आता टिकल्यांच्या पाकिटावर छायाचित्र असल्याने नेटिझन्सनी मोदी व भाजपला ट्रोल केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com