Loksabha 2019: राहुल गांधीकडून आघाडीसाठी नकार; केजरीवालांचे स्पष्टीकरण

Loksabha 2019: राहुल गांधीकडून आघाडीसाठी नकार; केजरीवालांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षासोबत आघाडी करण्यास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नकार दिला असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले. आज (ता.01) राहुल गांधी यांची अरविंद केजरीवाल यांनी भेट घेतली. त्यांनी आम आदमी पक्षासोबत हातमिळवणी करण्यास नकार दिला आहे असे अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

आपसोबत आघाडी करण्यावर दिल्ली काँग्रेसमध्ये मतभेद होते. शिला दीक्षित आणि तीन कार्यकारी अध्यक्षांचा आपसोबत आघाडीला विरोध होता. आघाडी केल्यानंतर 2020 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आपचा सामना कसा करणार? हा मुख्य प्रश्न होता. या आघाडीतून काँग्रेसला तसाही मोठा राजकीय फायदा मिळणार नव्हता असे म्हणूनच काँग्रेसने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, अरविंद केजरीवालांनी आघाडीसाठी राहुल गांधींची भेट घेतली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दिल्लीमध्ये आप-काँग्रेस आघाडीसाठी अरविंद केजरीवाल प्रयत्न करत होते. परंतु, त्यांचा हा प्रयत्न फसला आहे. काँग्रेसकडून आघाडीसाठी नकार देण्यात आला असल्याचे केजरीवालकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com