INS Viraat : मोदींचा 'तो' आरोप बिनबुडाचा : एल. रामदास

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मे 2019

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यासाठी रणधुमाळी देशात सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाहीर प्रचार सभा घेत आहेत.

अलिबाग (रायगड): भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधी यांनी आयएनएस विराट नौकेचा वापर आपल्या कौटूंबिक सहलीसाठी केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आरोप हा बिनबुडाचा आहे, असे माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी सांगितले.

अलिबाग तालुक्यातील भायमळा येथील राहत्या घरी माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी या आरोपाचे खंडन केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यासाठी रणधुमाळी देशात सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाहीर प्रचार सभा घेत आहेत. दिल्ली येथील रामलीला मैदानावर झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आरोप केले होते. त्यानंतर देशात खळबळ माजली आहे.

याबाबत माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी यावेळी सांगितले की, बेट विकासाचे भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधी हे प्रमुख होते. लक्षद्वीप बेटाच्या विकासासाठी राजीव गांधी हे पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सोनिया गांधी या उपस्थित होत्या. असे एल. रामदास यांनी सांगितले. तसेच ही भेट भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधी यांनी शासकीय दौऱ्या नुसार नियोजित होती. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले हे आरोप बिनबुडाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajiv Gandhi used INS Viraat for official visit says Reitred admiral officer of indian navy