उमा भारतींच्या मिठीत रडल्या साध्वी प्रज्ञा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 April 2019

भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकुर या आज उमा भारती यांना त्यांच्या निवासस्थानी भेटल्या आणि एकमेकींना मिठी मारताच साध्वी यांनी रडू कोसळले...

लोकसभा 2019
भोपाळ : येथील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकुर या आज (ता. 29) उमा भारती यांच्या गळ्यात पडून रडल्या. त्या प्रचारासाठी रवाना होण्यासाठी उमा यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यास गेल्या होत्या. या दरम्यान उमा या प्रज्ञा यांच्या पाया पडल्या. प्रज्ञा यांचे औक्षण करुन खीर खाऊ घातली आणि आपण तुमचा प्रचार करणार असल्याची खात्री दिली. 

उमा यावेळी म्हणाल्या, 'मी प्रज्ञा यांचा खूप सन्मान करते. मी त्यांच्यावर अत्याचार होताना बघितले आहे. त्यामुळे त्या मला पूजनीय आहेत. मी त्यांच्यासाठी प्रचार करेने.' प्रज्ञा यांनी देखील यावर मत मांडले. त्या म्हणाल्या, 'साधू-संन्यासी कधी एकमेकांवर नाराज होत नाही. मी त्यांना भेटायला आली आहे आणि आम्हा दोघींमध्ये नेहमी आत्मियतेचे संबंध राहीले आहे. काही गोष्टी राजकीय प्रपंचासाठी बनविल्या जातात.'

'प्रज्ञा आहेत महान संत' -
शनिवारी कटनी येथे उमा भारती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, 'प्रज्ञा महान संत आहेत आणि मी त्यांच्या समोर छोटासा प्राणी आहे.' यावर साध्वी यांचे म्हणणे होते की, 'उमा यांनी माझा इतका सन्मान केला पण त्या माझ्या पेक्षा मोठ्या आहेत आणि अधिक सन्मानीय आहेत.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sadhvi Pragya cried in Uma Bharatis hug in Bhopal