'सनी' कोणतीही असो पडणारचः काँग्रेस नेता

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 मे 2019

निवडणूकीच्या रिंगणात अभिनेता सनी देओल असो वा पॉर्नस्टार सनी लिओनी ते जिंकू शकणार नाहीत. ते पडणारच आहेत.

नवी दिल्ली: निवडणूकीच्या रिंगणात सनी देओल असो वा सनी लिओनी. काही झाले तरी ते पडणारच, असे काँग्रेस नेते राजकुमार चब्बेवाल यांनी एका प्रचारसभेत म्हटले आहे.

अभिनेते सनी देओल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून, पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदार संघातून ते निवडणूकीच्या रिंगणात आहेत. होशियारपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेदरम्यान बोलताना चब्बेवाल म्हणाले, 'पंजाबमधील तिन्ही मतदारसंघामध्ये त्यांना चांगले उमेदवार मिळू शकत नाहीत हेच नरेंद्र मोदी सरकारचे अपयश आहे. निवडणूकीच्या रिंगणात अभिनेता सनी देओल असो वा पॉर्नस्टार सनी लिओनी ते जिंकू शकणार नाहीत. ते पडणारच आहेत. काँग्रेसच्या वादळात सर्वजण उडून जातील.'

दरम्यान, अभिनेता विनोद खन्ना यांच्या निधनानंतर भाजपने अभिनेता सनी देओल यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. त्यांना पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदार संघातून भाजपने उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता राजकीय आखाड्यात सनी देओल आपले नशीब आजमावणार आहेत. सनी देओल यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांचे आव्हान आहे. सुनील जाखड विद्यमान खासदार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunny Deol Or Sunny Leone The BJP Will Lose In Punjab says Congress Leader