Loksabha 2019: भाजपवाल्यांनी बाळासाहेबांवरही टीका केली होती: राज ठाकरे (व्हिडिओ)

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 23 April 2019

माझ्यावर सुपारीवाले टीका करणारे भाजपवाले बाळासाहेब ठाकरेंवर पण अशीच टीका करायची. काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर 1980 मध्ये बाळासाहेबांवर अशीच टीका झाली होती. भाजपने कोणाकोणाची दारे ठोठावली आहेत, हे सांगायला लावू नका, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केली.

मुंबई : माझ्यावर सुपारीवाले टीका करणारे भाजपवाले बाळासाहेब ठाकरेंवर पण अशीच टीका करायची. काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर 1980 मध्ये बाळासाहेबांवर अशीच टीका झाली होती. भाजपने कोणाकोणाची दारे ठोठाली आहेत, हे सांगायला लावू नका, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केली.

लोकसभा निवडणुकीनिमित्त राज ठाकरे यांनी साम वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मोदी, शहा यांच्यावर जोरदार टीका करत भाजपने राबविलेल्या धोरणांमुळे देशाचे कसे नुकसान झाले यावर भाष्य केले.

राज म्हणाले, की नरेंद्र मोदींची अवस्था अशी झाली आहे, की नोकरी ड्रायव्हरची लागली आहे अन् गाडी ते मालकाच्या गाडीवर शिकत आहेत. पुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणांचे अपय़श होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात आरडीएक्स कोठून आले. काश्मीरमध्ये हेच भाजप मेहबुबा मुफ्तींबरोबर सरकारमध्ये होते. काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरच हा हल्ला झाला. 

Loksabha 2019 : हुतात्म्यांबद्दल बोलताना भाजपला लाज वाटत नाही का?: राज ठाकरे

 

मोदींकडे काहीच बोलण्यासारखे नाही
मोदी आता मेक इन इंडिया, नोटाबंदी, विकास या मुद्द्यांवर काहीच बोलत नाही. श्रीलंकेतील हल्ल्यावर बोलायला त्यांना वेळ आहे. पण, भारतातील परिस्थितीवर काहीच बोलत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP has accused Balasaheb Thackeray too blames Raj Thackeray