Loksabha 2019 : बसप राज्यात 48 जागा लढवणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 मार्च 2019

मुंबई - बहुजन समाज पक्ष राज्यात लोकसभेच्या 48 जागा स्वबळावर लढवणार असून येत्या 20 मार्चला पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. पहिल्या यादीमध्ये विदर्भातील बहुतांश मतदारसंघाच्या उमेदवारांची घोषणा होणार आहे.

देशात समाजवादी पक्ष वगळता इतर कोणत्याही राज्यात कॉंग्रेस सोबत आघाडी बसप करणार नाही, अशी घोषणा "बसप'च्या सर्वेसर्वा मायावती यांनी अलीकडेच केली आहे. त्यामुळे स्वबळावर बसप जागा लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यातील 48 मतदारसंघात बसपची विचारधारा मानणाऱ्या उमेदवाराला तिकीट दिले जाणार आहेत. पहिल्या यादीत किमान आठ ते दहा उमेदवारांची नावे असतील, अशी माहिती "बसप'चे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी दिली.

Web Title: Loksabha Election 2019 BSP Politics