Loksabha 2019 : कॅबिनेट मंत्रिपदाच्या बदल्यात माघार - आठवले

Ramdas-Athawale
Ramdas-Athawale

मुंबई - केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाच्या बदल्यात लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज स्पष्ट केले.

रामदास आठवले दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, त्यांनी प्रयत्न करूनही पदरी निराशा पडली. या मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आणि खासदार राहुल शेवाळे यांनी आज आठवले यांची भेट घेत पाठिंब्याची मागणी केली. या वेळी माझ्या उमेदवारीचा वाद आता मिटलेला आहे, असे आठवले म्हणाले.  या मतदारसंघासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे आग्रही होते. परंतु, मुख्यमंत्र्यांनी राज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे रामदास आठवले यांनी माघार घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com