Loksabha 2019 : घटक पक्षांची नाराजी दूर

Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीने घटक पक्षांतील कुठल्याच पक्षाला उमेदवारी न दिल्याने रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवलेंपासून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकरांपर्यंत सर्वांनीच नाराजीचा सूर आळवायला सुरवात केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जागा देण्याविषयी मधाचे बोट लावल्याने घटक पक्षांची नाराजी ‘वर्षा’ बंगल्यावरील चहाच्या कपातच मावळली. 
घटक पक्षांची समजूत घालताना फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकांचे आमिष त्यांना दाखवल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीत घटक पक्षांना त्यांच्या ताकदीनुसार जागा आणि मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल.

लोकसभेसाठी उमेदवारीचा आग्रह न धरता प्रचाराला लागून सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांना केले. लोकसभा निवडणुकीत सत्ता स्थापन झाल्यास विधानसभा नजरेच्या टप्प्यात येईल. घटक पक्षांना सत्तेत सामावून घेणे सोपे जाईल, अशी गळ फडणवीस यांनी घातल्याने बंडाच्या तयारीत असणाऱ्या घटक पक्षांचे बंड थंड झाले. त्यामुळे उद्या (ता. २४) कोल्हापूरमध्ये होणाऱ्या प्रचार सभेचा नारळ फोडण्यासाठी सर्व घटक पक्षांनी उपस्थित राहण्याचे मान्य केले.  

मित्रपक्षांना जागा न सोडल्याने आठवले, जानकर यांनी उघडपणे नाराजी व्यक्‍त केली होती. घटक पक्षांतील नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस यांनी ‘वर्षा’वर बैठक बोलावली होती. तिला रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेढे आणि सदाभाऊ खोत उपस्थित होते. फडणवीस यांनी या सर्वांचीच नाराजी दूर करत विधानसभेत घटक पक्षांना सन्मानाने योग्य जागा देण्याचे आश्‍वासन दिल्याचे जानकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी आमच्या शंकांचे निरसन केले आहे. सर्व घटक पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा प्रचार करतील.
- महादेव जानकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com