Loksabha 2019 : जानकर यांची भूमिका दोन दिवसांत स्पष्ट

Mahadev-jankar
Mahadev-jankar

मुंबई - राष्ट्रीय समाज पक्षाने (रासप) भाजपकडे लोकसभेच्या दोन जागा मागितल्या असून, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. या पार्श्‍वभूमीवर येत्या दोन दिवसांत भूमिका जाहीर करण्यात येईल, असे पक्षाचे महासचिव बाळासाहेब दोडतले यांनी कळविले आहे.

राष्ट्रीय समाज पक्ष हा राज्यातील सत्तेत सहभागी आहे. लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाने भाजपकडे दोन जागांची मागणी केली आहे. पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत आहेत. भाजप लवकरच रासपची मागणी पूर्ण करेल; तेव्हा कार्यकर्त्यांनी सयंम बाळगावा. 23 मार्चला रासपच्या पदाधिकाऱ्यांचा पुण्यात मेळावा होणार असून, त्यानंतरच रासपची भूमिका ठरणार असल्याचे दोडतले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com