Loksabha 2019 : टपाली मतदानाच्या मागणीत २० पट वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीसाठी टपाली मतदान करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अर्जांमध्ये यंदा २० पटींनी वाढ झाली आहे. मुंबईत सुमारे ५० हजार पोलिस कर्मचारी आहेत. त्यातील दहा हजारांहून अधिक जणांनी टपाली मतदानासाठी अर्ज केला आहे. २०१४ मध्ये केवळ ५०० पोलिसांनी अर्ज केले होते.

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी टपाली मतदान करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अर्जांमध्ये यंदा २० पटींनी वाढ झाली आहे. मुंबईत सुमारे ५० हजार पोलिस कर्मचारी आहेत. त्यातील दहा हजारांहून अधिक जणांनी टपाली मतदानासाठी अर्ज केला आहे. २०१४ मध्ये केवळ ५०० पोलिसांनी अर्ज केले होते.

राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्याच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. मतदारसंघातच बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना मतदानासाठी काही वेळ सूट दिली जाते; पण अनेक पोलिस मुंबईबाहेर मतदानाचा हक्क बजावतात. मुंबईबाहेरील मतदारसंघांत अनेकांची नोंद असते. अशा परिस्थितीत त्यांना मतदानाचा हक्क बजावणे शक्‍य होत नाही. त्यामुळे अशा पोलिसांसाठी टपाली मतदानाची व्यवस्था केली जाते. 

यंदा आतापर्यंत १० हजारांहून अधिक जणांनी अर्ज केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Web Title: Loksabha Election 2019 Post Voting Demand Increase Police