Loksabha 2019 : पुणे, माढ्याचा सस्पेन्स कायम

BJP
BJP

पुणे - लोकसभा निवडणुकीसाठी पुणे, माढा, सोलापूर आणि बारामती मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पहिल्या यादीत जाहीर न झाल्यामुळे मतदारसंघातील इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे, तर कार्यकर्त्यांची उत्कंठता शिगेला पोचली आहे. बारामतीमधील ‘सरप्राइज’ कोणते असेल, याबद्दलही विविध अंदाज व्यक्त होत आहेत.

भाजपने गुरुवारी जाहीर केलेल्या यादीत राज्यातील काही प्रमुख लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांची नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत. त्यामुळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. पुण्यात विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांची उमेदवारी कायम राहणार की पालकमंत्री गिरीश बापट बाजी मारणार, याबद्दल कुतूहल आहे. तसेच शहराध्यक्ष योगेश गोगावले, मुरलीधर मोहोळ आणि आमदार जगदीश मुळीक यांच्यापैकी कोणाला लॉटरी लागणार, याबद्दल कुतूहल आहे. माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले रणजितसिंह मोहिते पाटील यांचे नावदेखील आजच्या यादीत अपेक्षित होते. मात्र, त्यांचे नाव आलेले नाही. सोलापूर मतदारसंघातून विद्यमान खासदार शरद बनसोडे यांना वगळण्याची शक्‍यता असून, त्यांना पर्याय म्हणून आलेल्या नावांवर एकमत न झाल्याने तेथील उमेदवारी लांबणीवर पडल्याचे समजते. या मतदारसंघातून जय सिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी, राज्यसभेचे खासदार अमर साबळे व नुकतेच पक्षात आलेले प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या नावांवर विचार सुरू असल्याचे समजते. बारामती मतदारसंघात यंदा ‘सरप्राइज’ देण्याचा मानस भाजपने व्यक्त केला आहे. त्यासाठी रंजना कुल, उषा काकडे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. याशिवाय अन्य एखादा उमेदवारही येथे येऊ शकतो, असेही सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com