Loksabha 2019 : माढ्याच्या जागेसाठी मोहितेंचे दबावतंत्र

Ranjitsinh-Mohite-Patil
Ranjitsinh-Mohite-Patil

मुंबई - काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांचा भाजप प्रवेश होत असतानाच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालेवार नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची मंगळवारी भेट घेतल्याने चर्चेला मोठे उधाण आले.

रणजितसिंह भाजपात प्रवेश करणार काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय मंत्री असून, भाजपमध्ये त्यांना मानाचे पान आहे. राज्य सरकारचे संकटमोचक म्हणून महाजन ओळखले जातात. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाचे सर्व सोपस्कार महाजन यांनीच पार पाडले. त्याच महाजन यांच्या ‘शिवनेरी’ या मुंबईतील शासकीय निवासस्थानी रणजितसिंह यांनी आज सकाळी भेट घेतली.
रणजितसिंह यांचे वडील विजयसिंह मोहिते पाटील हे माढामधून लोकसभेसाठी या वेळी इच्छुक आहेत. मात्र, येथून निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना पक्षाने तयारी करण्यास सांगितले होते; परंतु मध्येच पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच माढामधून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. पवार कुटुंबीयांतील घडामोडीने पवार यांनी माढ्यातून माघार घेतली आहे. मग, राष्ट्रवादी काँग्रेसचा येथील उमेदवार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी दिली जाईल, अशी अटकळ मोहिते पाटील कुटुंबीयांकडून बांधली जात आहे. आम्हाला डावलल्यास आमच्यासमोर पर्याय आहे, असा राष्ट्रवादी काँग्रेसला अप्रत्यक्ष इशारा देण्यासाठी रणजितसिंह यांनी महाजन यांची भेट घेतल्याचे कळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com