Loksabha 2019 : महाराष्ट्रातही 'सप-बसप' एकत्र

SP-and-BSP
SP-and-BSP

मुंबई - उत्तर प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्रातही लोकसभा निवडणूक एकत्र लढविण्याचा निर्णय समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने घेतला आहे. कॉंग्रेस आघाडीशी अंतर ठेवून दोन्ही पक्षांनी राज्यातील लोकसभेच्या 48 जागा लढविण्याचे ठरविले आहे. या आघाडीची औपचारिक घोषणा मंगळवारी (ता. 19) केली जाणार आहे.

धर्मनिरपेक्ष आणि भाजपविरोधी मतांचे विभाजन होऊ नये म्हणून समाजवादी पक्षाने कॉंग्रेस आघाडीत सहभागी होण्यास अनुकूलता दर्शविली होती. मात्र, आघाडीकडून एकही जागा सोडली जात नसल्याने समाजवादी पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचे जाहीर केले होते. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी देशात कॉंग्रेससोबत कुठेही समझोता केला जाणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

समाजवादी पक्षाचा भर उत्तर भारतीयांप्रमाणे मुस्लिम मतदारांवर आहे; तर बसपची मदार दलित मतांवर आहे. या दोन्ही पक्षांच्या आघाडीमुळे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला मिळणाऱ्या मतांवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

बसपचे महाराष्ट्र प्रभारी अशोक सिध्दार्थ आणि सपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी आजच्या संयुक्त पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा करतील, अशी माहिती बसपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी सोमवारी दिली. आमची आघाडी महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघांत निवडणूक लढवेल, असेही त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com