सत्तेसाठी उद्धव ठाकरे लाचार - नीतेश

Nitesh-Rane
Nitesh-Rane

कोल्हापूर - ‘चौकीदार चोर है’पासून ‘मोदी मुर्दाबाद’चा नारा दिलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सत्तेसाठी लाचार झाले, स्वार्थासाठीच त्यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करताना स्वतःची विश्‍वासार्हताही गमावली आहे, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी आज कोल्हापुरात केली.

स्वाभिमान पक्ष महाराष्ट्रात लोकसभेच्या पाच जागा लढविणार असून, यापैकी माजी खासदार नीलेश राणे यांची पक्षामार्फत उमेदवारी यापूर्वीच जाहीर झाल्याची माहितीही त्यांनी दिली. आमचा मुख्य विरोधक हा शिवसेनाच असेल. शक्‍य असेल तिथे भाजपशीही आम्ही लढू. या पाच जागांपैकी एक जागा मुंबईतील, तर एक जागा ठाण्याची असेल, असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापुरातील स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयाला राणे यांनी भेट दिली. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की शिवसेनेला ज्या विश्‍वासाने महाराष्ट्राच्या जनतेने ६३ आमदार दिले, त्या जनतेला त्यांनी फसविले आहे. अशा प्रवृत्तींच्या विरोधात लढणे आमच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. नारायण राणे स्वतः आपल्या पक्षाचा जाहीरनामा तयार करणार आहेत. युती व आघाडीच्या राजकारणात आम्हाला चांगले उमेदवार मिळत आहेत. लोक आमच्याकडे आकर्षित होत आहेत.

‘पाचच जागा लढविणार’
नीतेश राणे महणाले, की आमच्या पक्षाची पहिली निवडणूक आहे. सर्व जागा न लढविता पाचच जागांवर लक्ष केंद्रित करणार आहे. मराठवाडा, विदर्भातून उमेदवारीची मागणी होत आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपमध्ये अधिकृत नाहीत. त्यांनी कुठलेही सदस्यपद स्वीकारलेले नाही. मित्रपक्ष म्हणून ते भाजपबरोबर आहेत; पण भाजपच्या जाहीरनामा समितीचा ते राजीनामा देणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com