Loksabha 2019 : ‘इतरांच्या पोरांचेही लाड मी पुरवतो’

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 मार्च 2019

मुंबई - ‘मी माझ्या पोरांसह इतरांच्या पोरांचेही लाड पुरवतो. दुसऱ्यांची पोरे फक्त नुसती धुणीभांडी करण्यासाठी असतात, असे आम्ही समजत नाही,’ असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला. 

सुजय विखे यांनी आज दुपारी उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली. या वेळी दक्षिण नगरमध्ये शिवसेनेने मनापासून मदत करावी, अशी विनंती सुजय यांनी उद्धव यांना केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव बोलत होते.

दक्षिण नगर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची असताना सुजय विखेंनी ही जागा सोडण्याची मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांना केली होती. मात्र सुजय यांचे आघाडीत योगदान काय, असा प्रश्‍न ‘राष्ट्रवादी’ने उपस्थित केला होता. यावर बोलताना शरद पवार म्हणाले होते, की मी माझ्या घरच्या मुलांचा हट्ट पुरवू शकतो; दुसऱ्यांच्या मुलांचे नाही, असे सांगत विखे पिता-पुत्रांना लक्ष्य केले होते.

यावर उद्धव ठाकरे म्हणाले, की आम्ही आमच्या पोरांसह इतरांच्या पोरांचेही लाड पुरवतो. दुसऱ्यांची पोरे फक्त धुणी, भांडीकुंडी करण्यासाठी असतात, असा माझ्या पक्षाचा विचार कधीच नव्हता आणि असू शकत नाही. शरद पवारांचा आधी पार्थच्या उमेदवारीला विरोध होता, आता उमेदवारी देणार म्हणतात आणि माढ्यातून लढू म्हणणारे पवार आता माघार घेतात, हे सारे पवार नीतीला धरूनच चालले आहे. आदित्य लोकसभा लढविणार नाही. भविष्यात निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय आदित्य आणि शिवसैनिक घेतील, असेही उद्धव यांनी स्पष्ट केले.

सुजय विखे पाटील यांना शुभेच्छा
काँग्रेसला रामराम करून भारतीय जनता पक्षात दाखल झालेल्या सुजय विखे पाटील यांनी बुधवारी ‘मातोश्री’वर हजेरी लावली. सध्या काँग्रेसमध्ये असलेले विरोधी पक्षनेते डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेनेतही काळ घालवला आहे.  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुजय यांना आज पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Loksabha Election 2019 Uddhav Thackeray Politics