Loksabha 2019 : राऊत, राणेंचा पराभव करा - दमानिया

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 एप्रिल 2019

खंबाटा एव्हिएशनचे कामगार देशोधडीला लागण्यास रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार विनायक राऊत आणि नारायण राणे कुटुंबीय, हे दोघेही जबाबदार असल्यामुळे या दोन्ही उमेदवारांना मतदान करू नका, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे.

मुंबई - खंबाटा एव्हिएशनचे कामगार देशोधडीला लागण्यास रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार विनायक राऊत आणि नारायण राणे कुटुंबीय, हे दोघेही जबाबदार असल्यामुळे या दोन्ही उमेदवारांना मतदान करू नका, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे.

मुंबईच्या विमानतळावरील कामांचे कंत्राट घेतलेल्या खंबाटा एव्हिएशन या कंपनीच्या मालकाशी आपापल्या कामगार संघटनांच्या माध्यमातून हातमिळवणी करून कामगारांचे मोठे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप राऊत आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नीलेश राणे यांनी गेल्या आठवड्यात एकमेकांवर केला. त्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या बाजूने हा विषय लावून धरलेल्या दमानिया यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषद घेऊन कामगारांचे नुकसान होण्यास हे दोन्ही उमेदवार जबाबदार असल्याचा आरोप केला आणि अशा लोकांना येथील जनतेने निवडून न देण्याचे आवाहन केले.

Web Title: Loksabha Election 2019 Vinayak Raut Narayan Rane Anjali Damania Politics