Loksabha 2019 :  निवडणूक विभागाने कंबर कसली

Loksabha 2019 :  निवडणूक विभागाने कंबर कसली

नवी मुंबई - लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पालिकेच्या निवडणूक विभागाने कंबर कसली आहे. केंद्राच्या ‘स्विप’ (सिस्टिमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ॲण्ड इलेक्‍ट्रोल पार्टीसिपेशन) या कार्यक्रमांतर्गत नवीन व मतदानाकडे पाठ फिरवणाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून जनजागृती केली जाणार आहे. यासाठी २९ एप्रिलपर्यंत विशेष मोहीम राबवली जाणार आहे. यात विभाग अधिकाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे.

नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस बाजवणे, मतदार नोंदणी व मतदार याद्यांमधील दुरुस्ती अशी कामे करणारा निवडणूक विभाग आता आगामी निवडणुकीच्या निमित्ताने कामाला लागला आहे. मतदानासाठी मतदारांना उद्युक्‍त करण्याचे मोठे आव्हान या विभागाला पार पाडायचे आहे. त्यासाठी केंद्राने सुरू केलेल्या ‘स्विप’ या कार्यक्रमानुसार जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे. यात शुक्रवारपासून जनजागृती सुरू झाली आहे. ऐरोलीतील दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात ३५० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. मतदान न केल्यास होणारे तोटे समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सेल्फी काढण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक निवडणूक अधिकारी संध्या अंबादे यांनी दिली. जनजागृतीसाठी उच्चभ्रू वसाहतीमधील ३२ सोसायट्यांची निवड करून, तेथील पदाधिकारी व रहिवाशांची बैठक घेऊन मतदानाच्या दिवशी सुटीवर जाणाऱ्यांची समजूत काढली जाणार आहे. मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही मोहीम राबवली जाईल, असे निवडणूक विभागाचे उपायुक्त महावीर पेंढारी यांनी सांगितले.

उपक्रम पाठशाला 
स्विप या राष्ट्रीय कार्यक्रमात जनजागृतीसाठी मतदारांना प्रश्‍नोत्तरांमधून माहिती मिळावी यासाठी पाठशाला असा उपक्रम सुरू केला आहे. यात काही विशेष प्रश्‍न तयार केले आहेत. त्यानुसार मतदारांना आत्मकेंद्रित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. काही खेळांमधून मतदान प्रक्रियेची माहिती दिली जाणार. 

‘आय विल व्होट’
‘आय विल व्होट’ मी मतदान करणारच या घोषवाक्‍यावर सध्या निवडणूक विभागाने जनजागृती सुरू केली आहे. यात नवमतदारांना मतदान कसे करावे, हे समजून सांगितले जाईल. 

येथे होणार जनजागृती
 उच्चभ्रूंच्या सोसायट्या
 रिक्षा थांबे, बस डेपोत चालकांचे प्रबोधन
 महाविद्यालये आणि विद्यापीठे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com