Loksabha 2019: काका राज ठाकरेंनी पाहिली अदित्यची सोय !

Loksabha 2019: काका राज ठाकरेंनी पाहिली अदित्यची सोय !

मुंबई : ठाकरे कुटुंबात राजकीय कलह असले, तरी नव्या पिढीसाठी सोय करण्याची परंपरा आहे. ही परंपरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तर कटाक्षाने पाळतात.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र युवा सेनेचे प्रमुख आदित्य यांनी मुंबईत वरळी येथे सभा ठेवली असल्याने आज 22 एप्रिल रोजी त्यांनी कोणतीही सभा मुंबईत ठेवली नाही.

आदित्य ठाकरे यांची युवासेनेच्या अध्यक्षपदी निवड झाली तेव्हा दादरमध्ये त्यांचे फलक लागले. या परिसरात असलेले मनसेचे फलक त्यानंतर लगेचच काढून घेण्यात आले होते. आजही राज यांनी मुद्दाम सभा घेतली नसावी, असा तर्क करण्यात येत आहे.

राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राळ उडवत फिरत असताना ते शिवसेनेबद्दल काहीही बोललेले नाहीत, हे उल्लेखनीय मानले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com