Loksabha 2019 : गावित शिवसेनेचे पालघरचे उमेदवार 

Loksabha 2019 : गावित शिवसेनेचे पालघरचे उमेदवार 

मुंबई - पालघर लोकसभेची जागा कोण लढणार, याचे उत्तर अखेर मिळाले आहे. दोन दिवसांपासून चर्चेत असलेले भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित शिवसेनेच्या तिकिटावर पालघरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. गावित यांनी आज "मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी श्रीनिवास वनगाही हजर होते. 

पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेतर्फे श्रीनिवास वनगा आणि भाजपच्या राजेंद्र गावित यांच्यात प्रमुख लढत झाली होती. यात राजेंद्र गावित यांचा विजय झाला होता. मात्र, शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर पालघरची जागा शिवसेनेच्या खात्यात आली. त्यामुळे या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची, यावरून खल सुरू होता. अखेर राजेंद्र गावितांना शिवसेनेकडून तिकीट देण्याचा निर्णय झाला. दुसरीकडे लोकसभेच्या तिकिटासाठी इच्छुक असलेले श्रीनिवास वनगा यांची आमदारकीवर बोळवण करण्यात आली. वनगांना विधिमंडळात पाठवणार असल्याचे आश्वासन उद्धव यांनी दिले आहे. 

भाजपातून शिवसेनेत प्रवेश केलेल्या नरेंद्र पाटील यांना शिवसेनेने सातारा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. पाटील सुरवातीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधान परिषदेतील आमदार होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी भाजपात प्रवेश केला होता आणि आता ते शिवसेनेकडून लोकसभेचे उमेदवार असतील.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com