Loksabha 2019 : मला पदावरून हटवले - संजय निरुपम 

Loksabha 2019 : मला पदावरून हटवले - संजय निरुपम 

मुंबई,- मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवले गेल्यानंतर संजय निरुपम यांनी मंगळवारी (ता. २६) पक्षातील गटबाजीवर अप्रत्यक्षपणे कोरडे ओढले. उमेदवारी दिल्याबद्दल पक्षश्रेष्ठींचे आभार मानतानाच मला पदावरून हटवले गेले आहे. निदान आता तरी पक्षातील गटबाजी संपू दे, अशा शब्दांत त्यांनी गटातटाच्या राजकारणावर टीका केली.

पद गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी निरुपम यांनी पत्रकारांशी बोलताना नाराजी अजिबात लपवली नाही. मी माझ्या मतदारसंघात लक्ष देणार आहे; मुंबईत अन्यत्र प्रचारासाठी मला कोणी बोलावले तरच मी जाईन, असेही ते म्हणाले. नवे अध्यक्ष मिलिंद देवरा यांचे अभिनंदन करताना, त्यांनी माझ्यासारखेच काम करावे. शहरातील सहाही जागा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल आणि त्याचे श्रेय देवरा यांनाच जाईल, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

चार वर्षांपासून मला पुष्कळ विरोध होता. तरीही मी लोकांमध्ये राहून त्यांच्या प्रश्‍नांसाठी आंदोलने केली. मुंबई प्रदेश काँग्रेसमधील गटबाजी कमी होणे अत्यंत कठीण आहे; पण निदान मी पदावरून गेल्यानंतर तरी ती गटबाजी संपू दे. आता जुने मतभेद आपल्याला विसरायचे आहेत, असे सांगताना त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत गटबाजीचा पुष्कळच त्रास झाल्याचे सूचित केले. निवडणूक जिंकण्यावर लक्ष केंद्रित करायचे असल्याने अध्यक्षपद सोडण्याचा माझा विचार सुरू होताच. पद कायमस्वरूपी नसते; केव्हा तरी पदावरून जायचेच असते, असे भावनिक उद्‌गारही त्यांनी काढले. तुम्हाला पदावरून हटवल्याने मतदारांमध्ये अविश्‍वासाची भावना निर्माण होईल का, या प्रश्‍नावर ज्याला कोणाला अन्य अर्थ काढायचे असतील त्यांनी ते काढावेत, असे उत्तरही त्यांनी दिले.

शेपूट तुटका कोल्हा
नरेंद्र मोदी स्वत-ला चौकीदार म्हणवून घेतात; पण त्यांचा राफेल घोटाळा उघडकीस आल्यावर ‘चौकीदार चोर है’ मोहीम देशात सुरू झाली. त्यामुळे शेपूट तुटक्‍या कोल्ह्याच्या न्यायाने केवळ आपल्या एकट्यावरच टीका नको; तर आपल्या इतर सहकाऱ्यांवरही लोकांनी टीका करावी म्हणून मोदी यांनी पक्षात मैं भी चौकीदार मोहीम सुरू केली, अशी टीकाही संजय निरुपम यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com