शिवसेना मतदारांना मुर्ख समजते का? हा व्हिडिओ पाहाच

शिवसेना मतदारांना मुर्ख समजते का? हा व्हिडिओ पाहाच

लोकसभा 2019 ः मुंबई : लोकसभेच्या 2014 च्या निवडणूक निकालापासून राजीनामे खिशात घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेने अखेर स्वबळाची तलवार म्यान करीत भाजपला युतीची 'टाळी' दिली. हिंदुत्वाच्या बुरुजावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे मनोमिलन झाले खरे; पण चार वर्षे गल्ली ते दिल्ली कार्यकर्त्यांतील विद्वेषाची दरी सांधण्याची कसोटी पणाला लागणार आहे. गेल्या पाच वर्षांत सतत भाजपला शिवसेना कार्याध्यक्ष यांनी इशारे दिले होते. पण, सत्तेसाठी त्यांनी भाजपचे कमळ हातात घेतले. त्यामुळे आता शिवसेना मतदारांना मुर्ख समजते का, हा प्रश्न पडतो.

गेली 25 वर्षे युतीत सडलो असे उद्धव ठाकरे यांनी यंदाच्या दसरा मेळाव्यात म्हटले होते. त्यानंतर त्यांनी युती गेली खड्ड्यात असेही बोलले होते. पण, आता निवडणुकीपूर्वी अशी कोणती गोष्ट शिवसेनेला भाजपची आवडली की त्यांना युतीशिवाय पर्याय नसल्याचे दिसत आहे. गेली पाचवर्षे आम्ही बरोबर होतो आणि पुढील पाच वर्षेही राहू असे सांगत यांनी पुन्हा एकदा मतदारांना मुर्ख ठरविले आहे. घराबाहेर भांड-भांड भांडायचे आणि घरात एकत्र संसार करायचा असेच यांच्या युतीवरून दिसत आहे. 

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज युतीबाबत पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर केला. पण, त्यांनी एकही पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले. पत्रकार परिषदेचे नियोजन केले पण युतीबाबत कोणतेही भाष्य टाळले. त्यामुळे भाजप आणि शिवसेना जनतेला गृहित धरते की काय हाच प्रश्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com