Narendra-Modi
Narendra-Modi

Loksabha 2019 : ‘चौकीदार चोर है’ सर्वत्र व्हायरल

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्‌वीटर अकाउंटचे नाव ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असे केल्यानंतर ‘चौकीदार’ हा शब्द चांगलाच ट्रेडिंग होत आहे. 

या शब्दाचा आधार घेत ‘कहो ना प्यार है’ गाण्याच्या धर्तीवर ‘चौकीदार चोर है’ असे गाणे तयार केले आहे.  

सध्या हे गाणे सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. निवडणुकीच्या काळात प्रचारगीतांच्या आधारे मतदारांना आकर्षित केले जाते. 
मात्र आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर अशी उपरोधिक गाणी नागरिकांच्या पसंतीस पडत आहेत. 

‘ये बंधन सरकारी, भारतका खोज हे, चौकीदार चोर है, चौकीदार चोर है’, ‘आझादी, हक्कदारी, परिवारसे बेकरार है, चौकीदार चोर है, चौकीदार चोर है’ असे गाणे असलेली ५९ सेकंदाची ही ऑडिओ क्‍लीप मंगळवारी सोशल माध्यमावर व्हायरल झाली. 

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान मोदींवर ‘चौकीदार चोर है’ असल्याचा आरोप करीत आहे. या आरोपाला उत्तर देण्यासाठी भाजपने ‘मै भी चौकीदार’ असा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरील नावाच्या पुढे चौकीदार असे टाकले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com