Election Results : 'लाव रे तो व्हिडिओ'ला उद्धव ठाकरेंचे 'लाव रे फटाके'ने उत्तर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'लाव रे व्हिडीओ'ची खिल्ली उडवितानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, 'लाव रे फटाके'. 

राज्यात आणि देशात युतीने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या काही सहकाऱ्यांसह मातोश्रीवर आले होते. येथे पत्रकारांना हे दोघे नेते सामोरे गेले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, की पराभवाने कधी मी खचलो नाही तर विजयाने कधी उन्मत झालो नाही. विधानसभेत आमची अशीच मैत्री राहणार नाही. 

ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या कुटुंबात प्रथमच पराभव झाला याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की आज विजय साजरा करू या. चर्चा करण्यापेक्षा विजय साजरा केला पाहिजे. आमच्या काही चुका झाल्या तर टीका करा. पण, नुसतीच टीका करू नका. विधानसभेचे निकाल लागले की पेढे खायला असेच मातोश्रीवर या असेही ते म्हणाले. 

उद्धव हे माझे मोठे भाऊ आहेत. उद्धव यांचे मोठे भाऊ नरेंद्र मोदी आहेत असे सांगताना ते म्हणाले, की मला अतिशय आनंद झाला आहे. मी आज बाळासाहेबांचा आशिर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवर आलो आहे. बाळासाहेब हे युतीची प्रेरणा होते. आज मला कै. गोपीनात मुंडे यांचीही आठवण येते. देशाच्या राज्याच्या हितासाठी आम्ही सोबत लढू. जनतेच्या दरबाराज काम करू. विश्वासाची परंपरा काम राखू.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray trolls Raj Thackeray after victory in Loksabha 2019