Loksabha 2019 : भाजप नेते ॲड. शिवाजी जाधव यांनी फडकावले बंडाचे निशाण

bjp minister shivaji jadav will file nomination as an independent candidate 
bjp minister shivaji jadav will file nomination as an independent candidate 

लोकसभा 2019
वसमत : हिंगोली लोकसभा मतदारसंघात भाजप नेते ॲड. शिवाजी जाधव यांनी बंडाचे निशाण फडकावले असून मंगळवारी (ता. 26) उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्‍याने लोकसभा निवडणुकीतील चुरस वाढणार आहे.

हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून आमदार हेमंत पाटील, काँग्रेसकडून माजी खासदार सुभाष वानखेडे, वंचित बहुजन आघाडीकडून मोहन राठोड यांची उमेदवारी जाहिर झाली आहे. त्‍यामुळे लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र उभे राहिले होते. भाजपकडून ॲड. शिवाजी जाधव यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र लोकसभेची जागा 
शिवसेनेकडे असल्‍यामुळे ॲड. जाधव यांना उमेदवारी मिळाली नाही. 

त्‍यानंतर त्‍यांना इतर पक्षाकडून उमेदवारीची ऑफर देण्यात आली होती. मात्र ॲड. जाधव यांना ऐनवेळी डावलण्यात आले. दरम्‍यान, आता ॲड. जाधव यांनी बंडाचे निशाण फडकावले असून लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्‍हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (ता. 26) ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्‍याचे सांगण्यात आले आहे. ॲड. जाधव यांना लोकसभा मतदारसंघामध्ये मागील तीन वर्षात चांगलाच जनसंपर्क झाला आहे. ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्‍वखर्चातून टोकाई कारखाना सुरु केला. याशिवाय वसमत पंचायत समितीवर एकहाती सत्ता मिळवली तर सहा जिल्‍हा परिषद सदस्यही निवडून आणले आहेत. 

याशिवाय उमरखेड परिसरातील पोफाळी कारखाना त्‍यांनी सुरु करण्याच्‍या हालचाली चालवल्‍या होत्‍या. ॲड. जाधव यांचे वडिल ॲड. मुंजाजीराव जाधव हे देखील वसमत विधानसभेचे प्रतिनिधीत्‍व केले. त्‍यामुळे ॲड. शिवाजी जाधव यांच्‍या उमेदवारीने हिंगोली लोकसभा मतदारसंघातील चुरस वाढणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com