Loksabha 2019 : शिवसेनेने तोडली काँग्रेससोबतची युती

congress shiv sena alliance broke in aurangabad MP Khaire announced
congress shiv sena alliance broke in aurangabad MP Khaire announced

लोकसभा 2019
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती झाल्याच्या पार्श्‍वभुमीवर औरंगाबाद जिल्हा परिषदेत असलेली शिवसेना काँग्रेसची युती बुधवारी (ता. 27) संपुष्टात आली. महापौर बंगल्यात शिवसेना व भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या चर्चेनुसार हा निर्णय घेण्यात आला. 
लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना भाजपची युती झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यात संयुक्‍त प्रचार सभांना सुरवात केली आहे. 

तथापि औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेची काँग्रेससोबत युती असल्याने भाजपचे स्थानिक पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्य आम्ही ग्रामीण भागात युतीचे चंद्रकांत खैरे यांना मतदान करा असे सांगायला गेल्यानंतर मतदार जिल्हा परिषदेत तर शिवसेना काँग्रेससोबत आहे? असा सवाल करतील. यामुळे कोणत्या तोंडाने ग्रामीण भागात मतदान करावे, असा सवाल जिल्हा परिषद सदस्य करुन काँग्रेसबरोबरची युती तोडावी, असा आग्रह भाजपकडून धरला जात होता. त्या पार्श्‍वभुमीवर बुधवारी (ता. 27) शिवसेनेचे नेते तथा युतीचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रुमख उपस्थितीत चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या बैठकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदेश प्रवक्‍ते शिरिष बोराळकर, आमदार अतुल सावे, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, बसवराज मंगरुळे यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. 

चहापानाच्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेतील काँग्रेससोबतची युती तोडण्याचा निर्णय झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार यापुढे सगळ्या निवडणुका शिवसेना भाजप युतीनुसारच लढणार आहोत. - खासदार, चंद्रकांत खैरे 

शिवसेनेने काँग्रेससोबतची युती तोडावी अशी मागणी होती. त्यानुसार आज खासदार श्री. खैरे यांनी जिल्हा परिषदेतील काँग्रेससोबतची युती तोडल्याचे जाहीर केले. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आचारसंहिता संपल्यानंतर भाजपकडे येईल. - एकनाथ जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष

जिल्हा परिषदेतील पक्षीय बालाबाल -
भाजप - 23 
शिवसेना - 18 
काँग्रेस - 16 
राष्ट्रवादी - 3 
आरपीआय - 1 
मनसे - 1 
एकुण - 62 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com