Loksabha 2019: निवडणुक लढणारच पण भाजपमध्ये जाणार नाही: सत्तार

Loksabha 2019: निवडणुक लढणारच पण भाजपमध्ये जाणार नाही: सत्तार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली म्हणजे याचा अर्थ मी भाजपमध्ये जाणार आहे, असा होत नाही. मी भाजपमध्ये जाणार नाही, पण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्टीकरण आज (ता. 24) काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले. 

औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून काँग्रेसने सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली असून, काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने अब्दुल सत्तार हे नाराज आहेत. त्यांनी औरंगाबाद काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून, हे सांगण्यासाठीच आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचे स्पष्टीकरण सत्तार यांनी दिले आहे.

अब्दुल सत्तार यांनी शनिवारी काल (ता. 23) रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले सत्तार हे पक्ष सोडण्याच्या मनःस्थितीत असल्याच्या चर्चांना यानंतर उधाण आले होते, ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. 

दरम्यान, औरंगाबादमध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी घडत असून सत्तार यांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. मात्र त्यांनी भाजप नेत्यांची भेट घेतल्याने ते इतर काँग्रेस नेत्यांप्रमाणे कमळ हाती घेणार का, याची आता उत्सुकता असतानाच त्यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. 

हेच सत्तार शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना काँग्रेसमध्ये आणण्याच्या प्रयत्नात होते. प्रत्यक्षात सत्तार यांच्यावरच पक्षाच्या निर्णयावर नाराज होण्याची वेळ आली आहे. सत्तार हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे समर्थक मानले जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com