Loksabha 2019 : मराठा शिवसैनिक सेनेचे पदाधिकारी स्थानबद्ध

मंगेश शेवाळकर
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

हिंगोलीत मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा सुरळीत पार पडावी, यासाठी मराठा शिवसैनिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना स्थानबध्द करून पोलिस ठाण्यात बसविले आहे. 

लोकसभा 2019
हिंगोली : आखाडा बाळापूर येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सुरळीत पार पडावी, यासाठी हिंगोली व आखाडा बाळापूर पोलिसांनी मराठा शिवसैनिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी (ता. 12) स्थानबध्द करून पोलिस ठाण्यात बसविले आहे. 

मराठा आरक्षण, धनगर आरक्षणासह इतर सामजिक प्रश्नांवर मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक विनायकराव भिसे पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाभरात तिव्र आंदोलन केले आहे. श्री. भिसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रश्नांवर आक्रमक आंदोलन केल्यामुळे नेत्यांच्या सभेच्या वेळी त्यांच्यावर करडी नजर ठेवली जाते. 

दरम्यान, आखाडा बाळापूर (ता. कळमनुरी) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी (ता. 12) सभा आयोजित केली आहे. सदर सभा सुरळीत पार पडावी यासाठी पोलिस विभागाने मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश युवा कार्याध्यक्ष विनायक भिसे पाटील, पंढरी ढाले, शाही पठाण, राजू पाटील, पिंटू जाधव, विजयराज पाटील, विजय शिंदे, गोपाल चव्हाण, मधुकर ढवळे, अमर खंदारे, अशोक जगताप यांना हिंगोली शहर पोलिसांनी स्थानबध्द करून पोलिस ठाण्यात ठेवले आहे. या शिवाय आखाडा बाळापूर येथे सचिन मिरासे, विठ्ठल मोरे, गोविंद शिंदे, गोविंद शिंदे बाभळीकर यांना स्थानबध्द करण्यात आले आहे.

Web Title: Maratha Shiv Sainik sena workers detained By hingoli police