Loksabha 2019 : मोदींना लाज वाटायला हवी - धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

मोदींनी मुरली मनोहर जोशी, नितीन गडकरी, शत्रुघ्न सिन्हा यांच्या नाराजी बाबत बोलावे, मात्र निवडणुकीच्या आधी मोदींना महाराष्ट्रात आल्यानंतर शरद पवार साहेब दिसतात. - विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे

लोकसभा 2019
परभणी : 'मोदींनी मुरली मनोहर जोशी, नितीन गडकरी, शत्रुघ्न सिन्हा यांच्या नाराजी बाबत बोलावे, मात्र निवडणुकीच्या आधी मोदींना महाराष्ट्रात आल्यानंतर शरद पवार साहेब दिसतात आणि निवडणुकीनंतर महाराष्ट्रात परत आल्यानंतर हेच मोदी मै तो शरदराव पवार साहब का हात पकडके राजनीती मै आया हुँ असे सांगतात. असे राजकारण करणाऱ्या मोदींना लाज वाटायला पाहिजे,' अशी गंभीर टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी (ता. 12) जिंतूर मध्ये केली. 

 जिंतूर (जि. परभणी) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी धनंजय मुंडे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. 
 विरोधी पक्षनेते मुंढे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबजानी दुराणी, आमदार विजय भांबळे, आमदार मधुसूदन केंद्रे, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुरेश वरपूडकर आदींची उपस्थिती होती.
 

Web Title: Narendra Modi should be ashamed says Dhananjay Munde