Loksabha 2019 : राहुल यांच्या सभेला गर्दी जमविण्याचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

वर्धा येथील सभेला म्हणावी तशी गर्दी जमली नाही, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे मोदी यांना राज्यातील जनतेने पहिल्याच सभेत दिलेल्या थंड्या प्रतिसादामुळे राहुल गांधी यांच्या सभेला गर्दी जमविण्याचे प्रदेश काँग्रेससमोर जबरदस्त आव्हान निर्माण झाले आहे.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा येथे झालेल्या सभेला गर्दी नसल्यामुळे सुखावलेल्या प्रदेश काँग्रेससमोर येत्या पाच एप्रिल रोजी वर्धा येथेच होणाऱ्या काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेला गर्दी जमविण्याचे आव्हान आहे.

राज्यात मोदी यांनी २०१४ मध्येदेखील वर्धा येथे पहिली सभा घेउन भाजप-शिवसेनेच्या प्रचाराला सुरवात केली होती. मागील लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या सभांना तुफान प्रतिसाद मिळाला होता. मोदी यांच्या राज्यात लाखांच्या सभा झाल्या होत्या. या वेळीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथून युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरवात केली. मात्र, वर्धा येथील सभेला म्हणावी तशी गर्दी जमली नाही, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे मोदी यांना राज्यातील जनतेने पहिल्याच सभेत दिलेल्या थंड्या प्रतिसादामुळे राहुल गांधी यांच्या सभेला गर्दी जमविण्याचे प्रदेश काँग्रेससमोर जबरदस्त आव्हान निर्माण झाले आहे.

 

Web Title: Challenge to gather crowds to Rahul gandhi rally