Loksabha 2019 : भाजपने दम भरल्यामुळे चौथ्या आघाडीचा स्वप्नभंग

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 मार्च 2019

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात डावलले जात असल्याची भावना झाल्याने चौथ्या आघाडीचा प्रयोग करण्यासाठी सरसावलेल्या मंत्री महादेव जानकर यांना भाजपने दम भरला आहे. त्यामुळे जानकर यांच्या राजकीय हालचाली थंडावल्या असून, राज्यातील संभाव्य चौथ्या आघाडीचे स्वप्न हवेत विरले आहे.

लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत भाजपने घटक पक्षांना जागा सोडल्या होत्या. मात्र या वेळी शिवसेनेबरोबर युती झाल्यानंतर भाजपच्या गोटातील घटक पक्षांना भाजपने वाऱ्यावर सोडल्याची घटक पक्षांची भावना झाली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व कॅबिनेटमंत्री महादेव जानकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची नुकतीच पुण्यात भेट घेतली होती. तीत जानकर यांनी चौथ्या आघाडीबाबत चर्चा केली होती. मात्र शेट्टी यांच्यासह "स्वाभिमानी'तून बाहेर पडलेले सदाभाऊ खोत, रिपब्लकिन पक्षाचे रामदास आठवले, शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी या आघाडीत सामील होण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानकर यांना शांत बसण्याचे आवाहन करीत दम भरल्याचे सांगितले जाते. त्यामुळे जानकर यांचा नाइलाज झाला आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Bjp fourth aghadi politics mahadev jankar