Loksabha 2019 : मुंबईत युतीची पुन्हा विद्यमानांनाच संधी?

Shivsena BJP
Shivsena BJP

मुंबई - शिवसेना-भाजपची युतीच्या विद्यमान खासदारांना मुंबईत पुन्हा संधी मिळणार आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये भाजप तीन व शिवसेना तीन अशा लोकसभेच्या सहा जागा लढवत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत युतीचे सहाही जागांवर उमेदवार निवडून आले होते. याच उमेदवारांना पुन्हा संधी मिळणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे.

शिवसेना-भाजपची युती झाल्यामुळे या दोन पक्षांनी राज्यात भाजपने २५, तर शिवसेनेने २३ जागा लढवण्याचे निश्‍चित केले आहे. यात मुंबईतील सहा जागांपैकी प्रत्येकी तीन-तीन जागा लढवण्यात येणार आहेत. गेल्या खेपेस शिवसेनेचे दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, वायव्य मुंबईतून गजानन कीर्तिकर तर भाजपचे उत्तर मध्यम मुंबईतून पूनम महाजन, ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या आणि उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी निवडून आले होते. सोमय्या यांना शिवसैनिकांचा विरोध आहे. त्यांचे काम करणार नाही, असा पावित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सोमय्या यांनी जहरी टीका केली होती. त्याचा राग शिवसैनिकांच्या मनात आहे. तरीही सोमय्यांनाच तिकीट दिले जाईल, असे भाजपमधून सांगण्यात येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com