Loksabha 2019 : रामदास आठवले यांची भाजपवर जाहीर नाराजी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 मार्च 2019

मुंबई - लोकसभा निवडणूक मी ईशान्य मुंबईतून लढावी, अशी येथील जनतेची भावना आहे. शिवसेनेलाही असे वाटत आहे. मात्र भाजपला मी ईशान्य मुंबईतून लढावे, असे अजून वाटत नाही, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. 

भाजपला वाटते, की मी दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढावी; तर शिवसेनेला वाटते मी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढावी. मात्र या दोन्ही जागांपैकी एक जागा रिपब्लिकन पक्षाला निश्‍चित मिळावी, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली. आज ते येथे जाहीर सभेत बोलत होते.

आठवले म्हणाले, की येथे शिवसेना-भाजप असा वाद करू नका. आता युती झाली आहे. आम्ही युतीसोबत आहोत. आम्हाला लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांनी प्रत्येकी एक जागा सोडली पाहिजे. या जागांवर आमचे  उमेदवार सहज विजयी होतील.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Ramdas Athawale Angry BJP Politics