Loksabha 2019 : शरद पवार यांनी फेरविचार करावा - रोहित पवार

Rohit-Pawar
Rohit-Pawar

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतल्याने पक्षात वादळ उठले आहे. एकाच घरातील तीन उमेदवार नसावेत, या प्रामाणिक भावनेतून पवार यांनी माघार घेतली. मात्र ‘पवारसाहेब यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा,’ अशी विनंती त्यांचे नातू व जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी केली आहे.

शरद पवार हे जनमानसांच्या मनातले नेतृत्व आहे. साहेब हवेवर राजकारण करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या माघारीच्या निर्णयानंतर वाटेल तसे बोलणाऱ्यांनी बेडकासारखे फुगू नये, असा टोलाही रोहित यांनी टीकाकारांना लगावला आहे. ‘साहेबांच्या निर्णयाचा आदर असणारच आहे. पण या आदराच्या पुढे प्रेम असते आणि माझे व माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेम आहे म्हणून आमच्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्याचे हेच मत आहे, की साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करा,’ अशी भावना रोहित पवार यांनी व्यक्‍त केली आहे. 
शरद पवार यांचे व माझे नाते आजोबा व नातवाचे असले तरी एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे हट्ट करण्याचा अधिकार मला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com