Palghar LokSabha 2019 : सायंकाळी सातपर्यंत 62.05 टक्के मतदान

palghar
palghar

पालघर : विद्यमान खासदार राजेंद्र गावित आणि बळीराम जाधव या दोघांमध्ये पालघर लोकसभा मतदारसंघासाठी चुरस आहे. या मतदारसंघात आज (सोमवार) सकाळपासून मतदानासाठी उत्साह दिसून येत आहे. येथे येथे सायंकाळी सातपर्यंत 62.05 टक्के मतदान झाले. 

पालघरमधून कोण निवडणूक लढविणार, यासंदर्भात प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वी जोरदार चर्चा रंगल्य होत्या. पालघरची जागा भाजपकडे होती. दिवंगत खासदार चिंतामण वनगा येथून निवडून 

आले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश केला; तर गावित यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत गावित निवडून आले होते. 

2019 च्या निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती झाल्याने श्रीनिवास वनगा यांची अडचण झाली होती. लोकसभा निवडणूक न लढविता वनगा यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

येथील विधानसभा मतदारसंघनिहाय आतापर्यंतची मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

डहाणू - 66.16
विक्रमगड - 69.50
पालघर - 64.82
भोईसर - 64.94
नालासोपारा - 50.93
वसई - 64.92

मतदानाची अंतिम आकडेवारी अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com