Loksabha 2019 : कल्याण लोकसभेसाठी राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची मांदियाळी 

There are NCP candidates for the Lok Sabha in Kalyan
There are NCP candidates for the Lok Sabha in Kalyan

कल्याण : या लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी पक्षाकडून अनेक वजनदार मंडळींची नावे चर्चेत होती. ठाणे महापालिकेचे नगरसेवक बाबाजी पाटील यांचेच नाव येथून आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा सोमवारी सुरु होती. मात्र, आता राष्ट्रवादीमधून अन्य सहा उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी 'सकाळ'ला दिली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज (बुधवारी, ता. 13) कल्याणमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. त्यामुळे उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. 

बाबाजी पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, विधानपरिषद आमदार जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे, कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष रमेश हनुमंते, कल्याण ग्रामीणचे स्थानिक नेते वंडार पाटील, केडीएमसीचे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे आदींची नावेही चर्चेत असल्याचे समजते. लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या उल्हासनगर आणि कळवा-मुंब्रा या दोन्ही विधानसभा क्षेत्रावर घड्याळाची पकड आहे. तर डोंबिवली शहर, कल्याण पूर्व आणि कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातून येथून मोठया प्रमाणावर मतदान होणार आहे. ही महत्वाची बाब लक्षात घेता कल्याण पूर्व परिसराची निवड केली गेली आहे. या ठिकाणी जमलेल्या कार्यकर्त्यांशी शरद पवार हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा संवाद साधून चर्चा करणार आहे. या संवाद कार्यक्रमात कल्याण डोंबिवलीतील कार्यकर्त्यांचा उमेदवारीबाबतचा कल विचारात घेऊनच संभाव्य उमेदवाराचे नाव घोषित केले जाण्याची शक्यता आहे. 

कल्याण डोंबिवली मध्ये राष्ट्रवादीमधील गटबाजी अनेकदा उघड झाली आहे. आता निवडणूक काळात घड्याळाला चावी देऊन गटबाजी करणाऱ्यांचे कान बारामतीकरांकडून उपटले जातात का? ते पाहावे लागेल. 
        
लक्षवेधी मुद्दे -

  • कळव्यापासून अंबरनाथ पर्यंत पसरलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण परिसराची संवादासाठी निवड 
  • स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देण्याची शक्यता 
  • संवाद कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह 
  • कल्याण डोंबिवलीचा कल महत्वाचा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com