राज ठाकरे.. आमदार शून्य; खासदार शून्य आणि प्रभावही शून्य!

Raj Thackray
Raj Thackray

लोकसभा निकाल 2019 : मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केंद्रबिंदू ठरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 'लाव रे तो व्हिडिओ' निष्प्रभ ठरल्याचे स्पष्ट झाले असून, मनसेला चोहोबाजूने टीकेला सामोरे जावे लागत आहे. 

यंदाची लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात त्यांनी राज्यभरात प्रचाराचा झंझावात केला. राज यांनी राज्यात दहा प्रचार सभा घेतल्या. त्यांच्या सभांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता.

मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिकसारख्या शहरात मनसेची मोठी ताकद असल्याचे 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत दिसून आले होते. लोकसभा मतदारसंघांचा विचार करता प्रत्येक मतदारसंघात राज यांची लाखांच्या घरात मते आहेत. त्यांच्या सभांमुळे यातील किमान निम्मी मते कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवारांना तारू शकतील, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत होती. मात्र, निवडणुकीचा निकाल पाहता ही मते नेमकी गेली कुठे, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. 

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधातील प्रचार संभांमध्ये मोदी यांची आधीची आश्‍वासने आणि त्यांनी केलेल्या विधानांच्या क्‍लिप दाखवीत ठाकरे यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या 'लाव रे तो व्हिडिओ'ला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या सभांची राज्यातच नव्हे, तर देशभरात चर्चा झाली होती. त्यामुळे सत्ताधारी पक्षांनी प्रचाराचा रोख राज यांच्याकडे वळविला होता. मात्र, राज्यातील निवडणुकीचे निकाल पाहता राज यांचा प्रचार निष्प्रभ ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. 

राज ठाकरे यांच्या सभांचा कॉंग्रेस आघाडीला फायदा झाला नाही, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे काही उमेदवार उभे केले असते, तर चित्र वेगळे दिसले असते. 
- शदर पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

'लाव रे तो व्हिडिओ'ची राज ठाकरे यांनी नौटंकी केली. मात्र, त्यांच्या नौटंकीला जनतेने साथ दिली नाही. 
- प्रसाद लाड, भाजप आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com