Loksabha 2019 : ‘स्वाभिमानी’ला सांगली; मेरिट कोणते?

 Loksabha 2019 :  ‘स्वाभिमानी’ला सांगली; मेरिट कोणते?

सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला द्यायचा निर्णय प्रदेश काँग्रेसने घेतला. हे सांगली जिल्ह्यातील नेत्यांना नक्कीच भूषणावह नाही. संघटनेला पक्ष म्हणून मान्यता हवी आहे आणि त्यासाठी किमान दोन खासदार हवेत. लढलेल्या एकूण जागा आणि तिथे पडणारी मते हे यासाठी की एकच चिन्ह मिळेल. भले मग त्यासाठी उमेदवार आयात करून लढावे लागले तरी हरकत नाही. यातून दिसते ती संघटनेची बार्गेनिंग पॉवरच. 

आता सांगलीतून स्वाभिमानीकडून माजी अधिकारी इंद्रजित देशमुख, भाजपचे बंडखोर नेते गोपीचंद पडळकर, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील अशी काही नावे चर्चेत आहेत. खासदार शेट्टी आणखी एक तगडा उमेदवार असल्याचेही सांगतात. एकूण काय स्वाभिमानीला आयातच उमेदवार करावा लागणार हे निश्‍चित. तोही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीतून. उमेदवारीचा वाद झाल्याने काँग्रेस पक्ष ही जागा दुसऱ्या पक्षाला देणार असेल तर देशात अनेक जागांवर वाद आहेत. येथील प्रत्येक जागा काँग्रेस दुसऱ्या पक्षाला सोडणार आहे का? याचे उत्तर पक्षश्रेष्ठींनी दिले पाहिजे.

खासदार शेट्टी एकमेव खासदार आहेत. या पक्षाचा हातकणंगले मतदारसंघात असलेला दबदबा पाहून येथील जागा राष्ट्रवादीने त्यांना सोडली आहे. यापूर्वी शेट्टी यांना पराभूत करण्याचे सर्व प्रयोग राष्ट्रवादीने करून पाहिले आणि आता शेट्टी ज्या भाजपच्या वळचणीतून माघारी परतल्यावर त्यांच्यासाठी ही जागा सोडण्याची राजकीय मुत्सद्दी राष्ट्रवादीने दाखविली आहे. ज्यांना गेल्यावेळी ते चोर म्हणत होते, सध्या त्यांच्यासमवेत प्रचार करायचा हे नाटक आता कार्यकर्त्यांना वठवावे लागणार आहे. शेट्टी यांचे जयंत पाटील यांच्याशी सूत जुळले असले तरी यापूर्वी ते सांगलीत दादा घराण्याशी जवळीक साधून होते.

अजूनही राजू शेट्टी सांगलीसाठी  पूर्ण आग्रही नसून तुपकर यांच्यासाठी त्यांचे पहिले प्राधान्य असणार असल्याचे खासगीत स्वाभिमानीचे पदाधिकारी सांगतात. शेतकरी संघटनेचे सांगलीत शेट्टींचे असे नेटवर्क व्यापक नाही. याउलट आजही काँग्रेस सर्वत्र तग धरून आहे.

विटा, जत, कडेगाव, पलूस येथे नगरपालिकांमध्ये सत्ता आहे. आजही  निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींत काँग्रेसचे कार्यकर्ते सत्तेत किंवा विरोधात आहेत. महापालिकेत निम्मे नगरसेवक काँग्रेसचे आहेत. गेल्या लोकसभेवेळी सव्वाचार लाख मते घेणारी काँग्रेस एका पराभवात संपली, असं गृहीत धरणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या या कृतीला मुत्सद्दीपणा कसला म्हणायचे ?

सांगलीत स्वाभिमानीचे नेटवर्क कमकुवत
वीस वर्षांपूर्वी शेतकरी संघटनेचा सर्वाधिक जोर सांगलीतच होता. येथून तो पश्‍चिम महाराष्ट्रात वाढत गेला; पण त्यावेळी जी शेतकरी संघटना होती, तिचे आता पूर्ण जनता दल झाले आहे. रघुनाथदादांची संघटना वेगळी आहे. सदाभाऊ यांनी देखील वेगळा पक्ष निर्माण केला आहे. त्यामुळे सांगलीत शेट्टींचे असे नेटवर्क व्यापक नाही. संदीप राजोबा किंवा महेश खराडे अशी काही नावे वगळली तर संघटनेकडे चर्चेतील नावे नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com