Loksabha 2019 : करवीर, हातकणंगलेत सर्वाधिक मतदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील दोन्हीही मतदारसंघांत मंगळवारी (ता. २३) चुरशीने मतदान झाले. आज दोन्हीही मतदारसंघांतील टक्केवारी निश्‍चित झाल्यानंतर कोल्हापूर मतदारसंघातील करवीर विधानसभा मतदारसंघात; तर हातकणंगले मतदारसंघातील हातकणंगले विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले. कोल्हापूर मतदारसंघात पुरुष व महिलांचे सर्वाधिक मतदान कागल तालुक्‍यात झाले आहे.

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील दोन्हीही मतदारसंघांत मंगळवारी (ता. २३) चुरशीने मतदान झाले. आज दोन्हीही मतदारसंघांतील टक्केवारी निश्‍चित झाल्यानंतर कोल्हापूर मतदारसंघातील करवीर विधानसभा मतदारसंघात; तर हातकणंगले मतदारसंघातील हातकणंगले विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले. कोल्हापूर मतदारसंघात पुरुष व महिलांचे सर्वाधिक मतदान कागल तालुक्‍यात झाले आहे.

हातकणंगलेमध्ये पुरुष आणि महिला मतदानातही हातकणंगले तालुकाच आघाडीवर आहे. 

२०१४ च्या निवडणुकीत कोल्हापुरात ७२ टक्के, तर हातकणंगलेत ७३ टक्के मतदान झाले होते. यावेळी ते अनुक्रमे ७०.७ व ७०.२८ टक्के झाले आहे.

२०१४ च्या तुलनेत यावेळी टक्केवारी कमी झाली असली तरी कोल्हापुरात गेल्यावेळी १२ लाख ५८ हजार ९८६ मतदान झाले होते. यावेळी ते १३ लाख २५ हजार १७४ झाले आहे. हातकणंगलेमध्ये गेल्यावेळी ११ लाख ८७ हजार ५२ मतदान झाले होते. यावेळी ते १२ लाख ४५ हजार ७९७ झाले आहे.

हातकणंगलेत गेल्यावेळच्या तुलनेत यावेळी ५८ हजार ७४५ एवढे, तर कोल्हापुरात मात्र २०१४ पेक्षा ६६ हजार १८८ एवढे मतदान जास्त झाले आहे. हे जास्त झालेले मतदानच निर्णायक ठरण्याची शक्‍यता आहे. 

कोल्हापूर मतदारसंघात २०१४ मध्ये सर्वाधिक ७८.७९ टक्के मतदान  करवीरमध्ये झाले होते. यावेळीही हाच मतदारसंघ आघाडीवर आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात गेल्यावेळी खासदार राजू शेट्टी यांचा बालेकिल्ला असलेला शिरोळ विधानसभा मतदारसंघ ७६.३२ टक्के मते देऊन आघाडीवर होता. यावेळी मतदानात हातकणंगले विधानसभा मतदारसंघाने बाजी मारली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Maximum Voting in Karveer Hatkanangale