Loksabha 2019 : नगरच्या दुष्काळमुक्तीसाठी संग्रामला लोकसभेत पाठवा - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

'राज्याच्या तुलनेत नगरचे प्रश्‍न वेगळे आहेत. येथील दुष्काळ पाचवीला पुजलेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू व त्यानंतर इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान म्हणून नगरच्या दुष्काळाची पाहणी केली होती. त्यावरून येथील भीषणतेची कल्पना येते. या पार्श्‍वभूमीवर, नगरला दुष्काळमुक्त करण्यासाठी आता संग्राम जगताप यांना लोकसभेत पाठवा,'' असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केले.

नगर - 'राज्याच्या तुलनेत नगरचे प्रश्‍न वेगळे आहेत. येथील दुष्काळ पाचवीला पुजलेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू व त्यानंतर इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान म्हणून नगरच्या दुष्काळाची पाहणी केली होती. त्यावरून येथील भीषणतेची कल्पना येते. या पार्श्‍वभूमीवर, नगरला दुष्काळमुक्त करण्यासाठी आता संग्राम जगताप यांना लोकसभेत पाठवा,'' असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केले.

नगर लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ मंगळवारी येथे झालेल्या सभेत पवार बोलत होते.

पवार म्हणाले, 1967 मध्ये यशवंतराव चव्हाणांनी राज्यातून सुमारे 25 ते 30 तरुणांना लोकसभेत येण्याची संधी दिली होती. त्या वेळी कोणी तरी चव्हाणांना, "नवख्यांना' संधी दिल्याचे विचारले होते. त्यावर चव्हाण यांनी, आपली पिढी काही दिवसांनी राजकारणात थांबणार आहे. महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार करता, पुढील 50 वर्षांचे नेतृत्व तयार करणे आवश्‍यक असल्याने तरुणांना संधी दिल्याचे त्यांनी सांगितले होते. मीही हाच कित्ता गिरवला. या वेळी महाराष्ट्रातून अनेकांना दिल्लीत जाण्याची संधी उपलब्ध करून दिली.''

Web Title: Loksabha Election 2019 nagar Drought Free Sangram Jagtap Sharad Pawar Politics