Loksabha 2019 : सोलापुरात आंबेडकरांचे जंगी शक्तिप्रदर्शन

Prakash-Ambedkar
Prakash-Ambedkar

सोलापूर - सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना सोमवारी काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांची प्रचार फेरी संपल्यानंतर काही वेळाने वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शक्तिप्रदर्शन केले. त्यामध्ये महिला, तरुण, ज्येष्ठांची संख्या मोठी होती. तसेच धनगर, मुस्लिम समाजांसह अन्य समाजांतील मतदारांचीही लक्षणीय उपस्थिती होती. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून शिंदे, आंबेडकर, तसेच भाजपचे डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी या तिघांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर महास्वामी आणि आंबेडकर यांनी आपली स्पर्धा शिंदेंशी नसून एकमेकांशी असल्याचे म्हटले आहे. मात्र, या तिरंगी लढतीत या दोघांच्या तुलनेत सुशीलकुमार शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com