Loksabha 2019 : निवडणूक खर्चात शिंदे आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

शिंदे, महास्वामी, आंबेडकर यांना नोटिसा
सोलापूर लोकसभेसाठी कॉंग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, भाजपचे डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी व वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर या तिन्ही उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च संनियंत्रण समितीच्या खर्चापेक्षा कमी दाखविला आहे. त्यामुळे या समितीचे प्रमुख महेश आवताडे यांनी तिन्ही उमेदवारांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

डॉ. जयसिद्धेश्‍वर दुसऱ्या, तर ऍड. प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानावर
सोलापूर - सोलापूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारावर दोन एप्रिलपर्यंत खर्च करण्यात कॉंग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आघाडीवर आहेत. त्याखालोखाल भाजपचे डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, तर तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी एका उमेदवाराला 70 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा निवडणूक आयोगाने घातली आहे. त्यांनी केलेल्या खर्चाचा हिशेब आयोगाकडे द्यायचा आहे. त्यासाठी आयोगाने निवडणूक खर्च ेंसंनियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. त्या कक्षाकडे असलेल्या शॅडो ऑब्जर्व्हेशन रजिस्टरच्या माध्यमातून कोणत्या उमेदवाराने किती खर्च केला आहे, याची माहिती ठेवली जाते. उमेदवार ज्या वेळी आपला खर्च या संनियंत्रण समितीकडे सादर करतात, त्या वेळी त्यांनी सादर केलेला खर्च व प्रत्यक्षात झालेला खर्च किती, याची माहिती या समितीकडे असते. त्यामुळे खोटा खर्च दाखविणे उमेदवारांना महागात पडण्याची शक्‍यता आहे.

शिंदे, महास्वामी, आंबेडकर यांना नोटिसा
सोलापूर लोकसभेसाठी कॉंग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, भाजपचे डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी व वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर या तिन्ही उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च संनियंत्रण समितीच्या खर्चापेक्षा कमी दाखविला आहे. त्यामुळे या समितीचे प्रमुख महेश आवताडे यांनी तिन्ही उमेदवारांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्याचे उत्तर उमेदवारांनी 48 तासांच्या आता देणे अपेक्षित आहे. तिन्ही उमेदवारांना शनिवारी (ता. 6) नोटिसा बजावल्या आहेत. आजअखेर या तिन्ही उमेदवारांनी नोटिशांना उत्तरे दिली नव्हती. त्यामुळे उद्या (सोमवारी) सायंकाळपर्यंत या तिन्ही उमेदवारांकडून नोटिशीला उत्तर दिले जाण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Sushilkumar Shinde Expenditure Politics