Loksabha 2019 : डाव-प्रतिडावांनी शिलेदारांची गोची

प्रवीण जाधव
मंगळवार, 16 एप्रिल 2019

वरिष्ठांकडूनही ‘डोस’
निवडणूक जशी अंतिम टप्प्यात आली, तशी उदयनराजेंकडूनही या शिलेदारांना साद घालण्याचे काम सुरू झाले आहे. उदयराजेंच्या प्रचारातील फळीने अनेकांच्या गुप्त बैठका घेतल्या आहेत. आजवर त्यांनी केलेल्या मदतीचा विचार करता काही शिलेदारांनी त्यांना प्रतिसाद देत कामही सुरू केले. स्वत: प्रत्यक्ष पुढे न येता कार्यकर्त्यांना उदयनराजेंच्या प्रचारात जुंपले. याची चाहूल लागल्यानंतर भाजपनेही मंत्री पाटील यांच्या माध्यमातून या शिलेदारांना डोस देण्यात आले आणि शिलेदारांना स्वत:च भाजपच्या प्रचारात सक्रिय व्हायला लावले आहे.

सातारा - मतदानाची तारीख जवळ आल्यामुळे निवडणुकीचा प्रचार भाजप व राष्ट्रवादी दोन्ही गटांनी गांभीर्याने घेतला आहे. एका-एका शिलेदाराला कामाला लावण्याचे दोन्हींचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दोन्ही बाजूने डाव-प्रतिडाव टाकले जात असल्याने भाजपवासी काँग्रेस-राष्ट्रवादी शिलेदारांची मात्र, चांगलीच गोची झाली आहे. काम करायचे कोणाचे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

लोकसभा निवडणुकीचे मतदान आठवड्यावर येवून ठेपले आहे. सातारा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्यात खरी लढत आहे. उदयनराजेंना या मतदारसंघात हॅट्ट्रिक साधायची आहे. तर, कोणत्याही परिस्थितीत साताऱ्यातून युतीचा उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांची मनधरणी करत भाजपमध्ये असलेल्या नरेंद्र पाटलांना उमेदवारी देण्याचा घाट घालण्यात आला. नरेंद्र पाटील यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेपासून भाजपच्या नेत्यांची यामध्ये असणारी उपस्थिती तेच स्पष्ट करत होती. मात्र, भाजपचे राजधानी विजयाचे हे स्वप्न अवलंबून आहे ते, त्यांनी इतर पक्षातून घेतलेल्या शिलेदारांवर.

गेल्या काही वर्षांमध्ये भाजपने जिल्ह्यातील राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये असणारे किंवा उदयनराजेंच्या जवळचे कार्यकर्ते गळाला लावले आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या माध्यमातून विधानसभेच्या चढाईची स्वप्ने पाहिली जात आहेत. या शिलेदारांना ताकद देण्याचे काम महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे त्यांनी लोकसभेच्या लढाईत भाजपला मदत 

Web Title: Loksabha Election 2019 Udayanraje Bhosale Narendra Patil Politics