Loksabha 2019 : प्रा. बानुगडे पाटील आहेत शिवसेनेचे स्टार प्रचारक

Professor Nitin Banugade Patil Name in Star Campaigner List of Shiv Sena
Professor Nitin Banugade Patil Name in Star Campaigner List of Shiv Sena

लोकसभा 2019
कऱ्हाड : शिवसनेने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचा समावेश आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांचाही त्या यादीत समावेश आहे.
त्यामुळे सातारा लोकसभासह अन्य लोकसभा मतदार संघात दोघांनाही फिरावे लागणार आहे.

शिवसेनेने आज त्यांच्या वीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यात प्रा. बानुगडे पाटील यांचाही समावेश आहे. पालकमंत्री शिवतारे यांचाही त्या यादीत समावेश केला आहे. त्याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य टाकरे यांच्यासह अनेक नेत्यांचासही समावेश आहे. प्रा. बानुगडे यांच्याकडे पक्षाने काही महिन्यापूर्वी कृष्णा खोरेची जबाबदारी सोपवली आहे. त्या नंतर प्रा. बानुगडे यांनी विविध ठिकाणची कामे मार्गी लावली आहेत. काही पाणी योजनाही त्यांनी पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे.  त्यांच्या कामाची दखल म्हणूनच त्यांनी स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश झाला आहे. अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

संबंधित बातमी :
Loksabha 2019 : शिवसेनेकडून 20 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com