Loksabha 2019 : मुख्यमंत्री हे दरोडेखोरांच्या टोळीत आहेत : खासदार राजू शेट्टी

Raju Shetty
Raju Shetty

 पुणे : भाजप ने काल कोल्हापूर मध्ये माझ्यावर आरोप केला..की मी चोराच्या आळंदीत गेलो आहे. पण मुख्यमंत्री हे दरोडेखोरांच्या टोळीत आहेत. अशी टीका स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

जे आमच्या बरोबर आहेत ते जर उद्या शेतकऱ्यांच्या विरोधात गेले तर मी त्याच्या विरोधात सुद्धा जाऊ शकतो. या आधी त्याच्या विरोधात अनेक आंदोलन केली आहेत. हे लक्ष्यात ठेवावे. मी चोराच्या आळंदीत गेलो आहे. पण मुख्यमंत्री हे दरोडेखोरांच्या टोळीत आहेत, कारण मुख्यमंत्र्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर बिल्डरांना लाभ मिळवून दिला असल्याचा आरोप केला होता. परंतु, त्यांचाच मुलगा भाजप मधून निवडणूक लढवतो आहे त्याचे उत्तर आधी द्यावे असेही राजू शेट्टी म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने  10 हजार कोटींची घोटाळा झाला आहे.. महाराष्ट्र ग्रह निर्माण मध्ये साहित्य खरेदी मध्ये भारष्टाचार झाला आहे..तो लवकरच बाहेर काढणार असल्याचे सुचक इशारा खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com