Loksabha 2019: काँग्रेसचा मोठा नेता भाजपच्या गळाला, त्यांनाच माढ्यातून उमेदवारी?

Loksabha 2019: काँग्रेसचा मोठा नेता भाजपच्या गळाला, त्यांनाच माढ्यातून उमेदवारी?

सातारा: काँग्रेसचा आणखी एक मोठा नेता भाजपच्या गळाला लागला असून काँग्रेससाठी हा मोठा झटका आहे. काँग्रेसचे साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उद्या (25) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सोमवारी संध्याकाळी मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करतील.

माढा लोकसभा मतदारसंघातील विजयसिंह मोहिते पाटील यांच्यानंतर रणजितसिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश होत आहे. त्यामुळे माढ्यातील भाजपाचा उमेदवार कोण? याबाबत पेच निर्माण झाला असून, फलटणच्या निंबाळकरांना भाजपकडून माढ्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राष्ट्रवादीनंतर भाजपने काँग्रेसलाही खिंडार पाडले आहे. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण हे तीन तालुके माढा मतदारसंघात येतात. या भागात रणजितसिंह यांचा चांगला प्रभाव आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी भाजपसाठी फायद्याची ठरू शकते. माढा मतदारसंघात राष्ट्रवादीने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

दरम्यान, सुजय विखे, रणजितसिंह मोहिते पाटील आणि भारती पवार यांच्यानंतर आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव भाजपाबरोबर जोडलं जाणार आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस पक्षात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अंतर्गत कलहामुळे त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com