Loksabha 2019: सुजय विखेंचे शिवसेनेकडून स्वागत तर, भाजप गैरहजर

Loksabha 2019: सुजय विखेंचे शिवसेनेकडून स्वागत तर, भाजप गैरहजर

नगर- डॉ. सुजय विखे पाटील यांचे आज नगरमध्ये शिवसेनेतर्फे स्वागत करण्यात आले. उपनेते अनिल राठोड यांच्या निवासस्थानी राठोड यांच्या पत्नी शशिकला यांनी डॉ. विखे पाटील यांचे औक्षण केले.

माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक गणेश कवडे, योगीराज गाडे, बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम, विक्रम राठोड, सचिन शिंदे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, डॉ. विखे पाटील यांनी आज खासदार दिलीप गांधी व पक्षाच्या कार्यालयास भेट देण्याचे नियोजन केले होते. तथापि, त्यांचा कोणाशीही संपर्क झाला नाही. पक्षाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड नगरमध्ये नसल्याची व खासदार गांधी यांनी भेट टाळल्याची चर्चा होती. पक्षाचे गांधी मैदान येथील कार्यालय आज बंद होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com