Loksabha 2019 : सुशीलकुमारांच्या प्रचाराचा उद्या तीन ठिकाणी फुटणार नारळ

Sushilkumar Shinde will start the campaign tomorrow for loksabha election 2019
Sushilkumar Shinde will start the campaign tomorrow for loksabha election 2019

लोकसभा 2019
सोलापूर : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचाराचा उद्या (शुक्रवारी) तीन ठिकाणी नारळ फुटणार आहे. 
ज्येष्ठ नेते शरद पवार, ज्योतिरादित्य शिंदे, अभिनेता चिरंजीवी आणि अभिनेत्री विजयाशांती यांच्या सभांचेही आयोजन करण्यात येणार आहे, 
अशी माहिती प्रचार प्रमुख तथा माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी दिली. 

उद्या (शुक्रवारी) सकाळी 10 वाजता मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात येईल. अध्यक्षस्थानी माजी आमदार दिलीप माने असतील. दुपारी 2 वाजता वडापूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, तालुकाध्यक्ष गुरुसिद्ध म्हेत्रे, सुरेश हसापूरे यांच्या उपस्थितीत नारळ फोडण्यात येईल. दुपारी 4 वाजता हत्तूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा प्रारंभ करण्यात येणार आहे. 

प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले, राष्ट्रवादीचे नेते दीपक साळुंखे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, जेष्ठ नेते राजशेखर शिवदारे, गोपाळराव कोरे, बसवराज बगले, गटनेते चेतन नरोटे, कार्याध्यक्ष अश्पाक बळोरगी, शिवलिंग सुकळे, महिला जिल्हाध्यक्ष इंदुमती आलगोंडा पाटील उपस्थित राहणार आहेत, अशीही माहिती श्री.यलगुलवार यांनी दिली.  

नेते व अभिनेत्यांच्या प्रचार सभा -
श्री. शिंदे यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, गुलाम नबी आजाद, ज्योतिदारित्य शिंदे, राजू शेट्टी, प्रा. जोगेंद्र कवाडे, डॅा. राजेंद्र गवई, अभिनेता चिरंजीवी, अभिनेत्री विजयाशांती, रामचरण, मोहनबाबू, उर्मिला मार्तोंडकर, चंद्रकांत हांडोरे यांच्या सभा आयोजिण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com